गाझियाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रिजपाल तेवतिया यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये तेवतिया गंभीर जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाडीमधून आलेल्या या हल्लेखोरांनी तेवतिया आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांवर AK-47 नं जवळपास 100 राऊंड फायर केले. यामध्ये तेवतिया आणि अन्य पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींना गाझियाबादच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता त्यांना नोएडामधल्या फोर्टीस हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं आहे.