नवी दिल्ली : ब्रिटिश नागरिकतेबाबत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडलेल्या राहुल गांधींना भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 'मूर्ख' करार दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी दुहेरी नागरिकता घेतल्याचा आरोप स्वामी यांनी केलाय. यावर लोकसभेच्या एका समितीकडून राहुल गांधींना एक नोटीसही पाठवण्यात आली होती. त्याला लोकसभेत गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर दिलंय. 


स्वामींनी आपला ब्रिटिश पासपोर्ट नंबर आणि इतर संबंधित कागदपत्रं सार्वजनिक करावीत, असं आव्हानंच राहुल गांधींनी दिलंय. समिती सचिवालयाला २३ मार्च रोजी दिलेल्या आपल्या उत्तरात काँग्रेस उपाध्यक्ष म्हणतात, 'मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. मी ना कधी ब्रिटिश नागरिकतेसाठी अर्ज केला आणि ना कधी ब्रिटिश नागरिकता स्वीकारली. माझी ओळख ही एक भारतीय म्हणूनच आहे'.


यावर, प्रत्यूत्तर देताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राहुल गांधी मूर्ख असल्याचं म्हटलंय.