भाजप नेत्या उमा भारतींचं पुन्हा मंदिर `अभी` बनाएंगे
अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी अयोध्येत मंदिर बनवण्याची योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी आज रात्रीच अयोध्येला दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
या विषयी आपलं पंतप्रधानांशी कोणतंही बोलणं झालेलं नाही, अयोध्येला जाण्याचा आपला निर्णय असल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी मी जीव देण्यासही तयार आहे, अयोध्येत राम मंदिराचं निर्माण होणारच असं म्हणून अनेक वर्षांनंतर उमा भारती यांनी मंदिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
काँग्रेसला आमच्या नेत्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, न्यायालयाचे मी आभार मानते, न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.