भुवनेश्वर : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी उद्या आणि परवा भुवनेश्वरमध्ये होतेय. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या दिग्विजयानंतर होणारी ही पहिलीच कार्यकारिणी असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना आगामी काळात आव्हान देण्याची तयारी म्हणूनही या बैठकीकडे बघितलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांमध्ये अशाप्रकारे बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्याची भाजपची रणनीती राहीलीये. उत्तर प्रदेश निवडणूकीपूर्वी अलहाबादला राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती.


2019 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. गेल्या 17 वर्षांपासून राज्यात असलेली बिजू जनता दलाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाचे सर्वच ज्येष्ठ मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित असतील.