कोकणातील राजेशाही पर्यटन स्थळ; एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला डोळे दिपवणारा राजवाडा

एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा भव्य राजवाडा कोकणात नेमका आहे कुठे? जाणून घेऊया या पर्यटनस्थळाविषयी. 

| Jul 04, 2024, 00:13 AM IST

Ratnagiri Thiba Palace : अथांग सागरी किनारा आणि अद्भूत निसर्ग सौंदर्य म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहतो तो महाराष्ट्रातील कोकण. कोकण म्हणजे स्वर्ग याच कोकणात एक राजेशाही पर्यटन स्थळ आहे. एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात डोळे दिपवणारा राजवाडा बांधण्यात आला. रत्नागिरीतील हे सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.  बस ने प्रवास करत असल्यास रत्नागिरी बस स्थानकात उतरुन तिथून रिक्षाने अवघ्या 10 ते 15 मिनीटांत येथे पोहचता येईल.

 

1/7

रत्नागिरी जिह्यात एक भव्य राजवाडा आहे जो ब्रिटीशांनी एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला होता. हा राजवाडा म्हणजेच ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावाच म्हणावा लागेल.   

2/7

या राजवाड्यातून सोमेश्वर नदी खाडी, भाट्ये समुद्र किनारा यांचे अतिशय मनमोहक दृष्य दिसते. याला थिबा पाईंट असेही म्हणतात. थिबा पाईंट सूर्यास्तासाठी देखील प्रसिद्ध आहे.  

3/7

 हा राजवाडा तीन मजली आहे.  राजवाड्याचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. कौलारु छत असलेला हा भव्य दिव्य राजवाडा पाहून पर्यटक थक्क होतात. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती. 

4/7

आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. या राजवाड्यात थिबा राजाने वापरलेल्या अनेक गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.  

5/7

थिबा राज्याच्या नावावरुनच या राजवाड्याला थिबा पॅलेस असे नाव देण्यात आले आहे.  1910 मध्ये हा राजवाडा बांधम्यात आला होता. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा आणि राणी वास्तव्यास होते. 

6/7

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता.

7/7

ब्रिटीशांनी बांधलेल्या या राजवाड्याचे नाव आहे थिबा पॅलेस. हा राजवाडा रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे. पर्यटक या पॅलेसला आवर्जून भेट देतात.