डेहराडून : रागाच्या भरात उत्तराखंडमध्ये एका भाजप आमदाराने घोड्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीये. या आमदाराने त्या घोड्याला इतके मारले की त्या घोड्याचा पायच मोडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर भाजप आमदार गणेश जोशी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डेहराडूनचे पोलीस अधीक्षक सदानंद दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये जोशी लाठीच्या सहाय्याने मारताना दिसतायत. जोशी आणि अन्या काही लोकांविरोधात तक्रार दाखल केलीये. 


सोमवारी राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारला विरोध दर्शविताना विधानसभेला घेराव घातला होता. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता. काही पोलीस घोड्यावर होते. 


मिळालेल्या रिपोर्टनुसार, यादरम्यान एका घोड्याने भाजपच्या एका नेत्याला लाथ मारली. यामुळे भाजप कार्यकर्ते भडकले. तेव्हा मसूरीचे भाजप आमदार गणेश जोशी यांनी लाठीच्या सहाय्याने घोड्याला मारहाण कऱण्यास सुरुवात केली. इतकं अमानुषपणे मारलं की घोड्याचा एक पाय मोडला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. 


दरम्यान, या प्रकरणी जोशी यांना विचारले असता घोड्याने दिवसभर पाणी प्यायले नव्हते त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. पाणी प्यायल्यानंतर तो ठीक झाला. तो तहानलेला होता. यात माझा काही दोष नाही असे स्पष्टीकरण दिले. 


दरम्यान, या प्रकऱणी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी तुम्ही एका घोड्याव लाठी उगारली आहे? मला वाटते सहिष्णुता हा शब्द भाजपच्या डिक्शनरीमध्ये नाही अशी प्रतिक्रिया दिली.