नवी दिल्ली : अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट टीममध्ये आरक्षण असावं, अशी मागणी अखिल भारतीय अनुसुचित जाती जमाती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार उदीत राज यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट खेळताना दलित असल्यामुळे अन्याय झाल्याचं विनोद कांबळीनं मला सांगितलं होतं. पण पेज 3 लाईफवर परिणाम व्हायच्या भीतीनं विनोद कांबळी यावर काही बोलणार नसल्याचंही उदीत राज म्हणाले आहेत.