नवी दिल्ली : भाजप खासदार तरूण विजय नव्या वादात अडकले आहेत. भारतामध्ये वर्णद्वेश नही, असं सांगताना आम्ही 'काळ्या' दक्षिण भारतीय लोकांसोबत गुण्यागोविंदानं राहतो, असं सांगत वाद ओढवून घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आंतरराष्ट्रीय वाहिनीवर चर्चेच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. आम्ही भारतीय वर्णवादी असतो, तर आमच्याकडे दक्षिण भारत का असता? तामिळ, केरळ, कर्नाटक, आंध्र इथल्या लोकांसोबत आम्ही का राहिलो असतो का, असा सवाल उपस्थित केला. 


आमच्या देशात काळे लोक आहेत. आमच्या आसपास काळे लोक आहेत, असे तरुण विजय म्हणालेत. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यांनी वर्णभेद तसेच वर्णद्वेश नसल्याचे सांगतानाच त्याचा उच्चार केल्याने त्यांची अडचण वाढली आहे.