नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी दिल्लीमध्ये आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होते आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थीत रहाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा याच बैठकीत निर्णय होईल अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये चुरस देखील पाहायला मुळते आहे. पण मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे संसदीय बोर्डच ठरवणार आहे.


मणिपूर आणि गोवामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. कोणालाही बहुमताचा आकडा नाही गाठता आला त्यामुळे इतरांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहेय. याबाबतही या बैठकीत चर्चा होईल.