पंजाब : पंजाब भाजपचे अध्यक्ष विजय सांपला यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. पंजाबमध्ये गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या उमेदवार यादीवरून सांपला नाराज असल्याचं पुढे येतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांपला यांनी आपला राजीनामा अमित शाह यांच्याकडे पाठवल्याचं वृत्त होतं. मात्र सांपला यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. सांपला यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ऐन निवडणूकीच्या तोंडावर सांपलांची नाराजी पुढे आल्यानं पंजाबमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराला चांगला फटका बसण्याची चिन्हं आहेत.