लखनऊ : नोटबंदीनंतर देशभराक रोख रक्कमेची कमतरता भासत आहे. नोटबंदीला महिना पूर्ण झाला आहे. अजूनही काही ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पण भाजपने मात्र या निवडणुकीच्या प्रचारासाठी 1650 बाइक खरेदी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1650 बाइक्सच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते प्रचार करणार आहेत. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून या बाईक्स वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करणार आहेत.


'कमल संदेश' असं या अभियानाचा नाव ठेवण्यात आलं आहे. 18 डिसेंबरला प्रदेशाध्यक्ष केशव मौर्य या गाड्यांचं वितरण करणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्राला 4 बाईक्स देण्यात येणार आहेत. या सर्व बाईक्स चेकच्या माध्यमातून खरेदी केल्या गेल्या आहेत. विरोधी पक्षाकडून आता यावरुन टीका सुरु झाली आहे.