पंतप्रधान घेतायत भाजपशासित मुख्यमंत्र्यांची शाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, हेही उपस्थित असणार आहेत.
मोदी या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा घेणार आहेत. सोबतच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.
जीएसटी तसंच नवीन शैक्षणिक धोरण कसं असावं यावरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र सदनाला भेट देणार आहेत.