इंदूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर,  एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तो चिंतेत आहे आणि त्याने मदतीसाठी ग्राम पंचायत अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी आवाहन केले आहे.


देवासच्या सिया गावात भिकारी सिताराम हे पैसे घेऊन ग्राम पंचायत कार्यालयात पोहोचला, ते ५०० आणि १००० नोटाच्या स्वरूपात ९८ हजार रूपये होते.


साहेब ही माझ्या जीवनाची कमाई आहे, आणि लोक म्हणत आहेत की ही कमाई आता वाया गेली. ही त्या भिकाऱ्याची २० वर्षाची कमाई असल्याचं त्याने सांगितलं.


सितारामचं बँक अकाऊंट उघडणार!
सिताराम यांच्या ९८ हजारावर ग्राम पंचायत अधिकाऱ्याने काही उपाय काढलेला नाही. त्यांच्या मते सितारामकडे  बँकेत अकाऊंट नाही. यासाठी ते बँक अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत, सितारामला बँक अकाऊंट उघडण्यास काही मदत करायची असेल तर आम्ही नक्की करू, असं सितारामने म्हटलं आहे.