बंगळुरू :  सध्या देशातील विविध राज्यांमध्ये १० वी आणि १२ वीचे निकाल येणे सुरू आहेत. अशात  अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणा ठरू शकतो, असा कामगिरी बी. एस. रंजन नावाचा १६ वर्षीय विद्यार्थ्याने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याला अनेक विद्यार्थी अशक्यप्राय गोष्ट मानतात असे काम रंजन याने केली आहे. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 


राज्यातील पहिला विद्यार्थी


बी.एस. रंजन कर्नाटकातील शिवमोग्ना जिल्ह्यातील पूर्णप्रज्ञा उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आहे. १६ वर्षीय या विद्यार्थ्याने ६२५ पैकी ६२५ गुण मिळविण्याची किमया केली आहे. असे करणारा तो राज्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. 


कोणतीही ट्युशन लावली नाही....


राज्यात पहिला आलेल्या या विद्यार्थ्याने कोणतीही ट्युशन लावली नव्हती. दररोज पाच ते सहा तास अभ्यास करत होता.