गोवा : गोव्यामध्ये उद्यापासून भारत, ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेची परिषद होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाचही राज्यांचे प्रमुख नेते आणि अनेक वरिष्ठ अधिकारी परिषदेत उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिषदेमध्ये भारत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानची कोंडी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पठाणकोट आणि उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं भारत या परिषदेत सहभागी झालेल्या देशांना पुन्हा एकदा पटवून देत, पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करेल. या परिषदेला चीनचे राष्ट्रपती जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिनही उपस्थित राहणार आहेत.


एरवी पर्यटकांनी गजबजलेल्या गोव्याच्या किनाऱ्यांना लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. दक्षिण गोव्यातल्या बेनौली या निसर्गरम्य गावामध्ये ही परिषद होतेय. दाम्बोली विमानतळापासून बेनौलीपर्यंतच्या रस्त्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. समुद्रामार्गे हल्ल्याची शक्यता गृहित धरून तटरक्षक दल तसंच नौदलाची गस्तही वाढवण्यात आलीये. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.