लग्नाचे दोनदा प्रयत्न झाले मात्र तरीही तो राहिला अविवाहित
म्हणतात ना नशीबाची साथ नसेल तर कितीही प्रयत्न करा काहीच हाती लागत नाही. असेच काहीसे छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यात एका नवऱ्यामुलासोबत घडले.
नवी दिल्ली : म्हणतात ना नशीबाची साथ नसेल तर कितीही प्रयत्न करा काहीच हाती लागत नाही. असेच काहीसे छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यात एका नवऱ्यामुलासोबत घडले.
पहिले लग्न मोडल्याने दुसऱ्यांदा त्याच्या लग्नासाठी प्रयत्न झाले मात्र तेही अपयशी ठरले. पहिल्यांदा जिच्याशी त्या मुलाचे लग्न होणार होते ती मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. यानंतर दोन्ही घरातील मंडळींनी एकत्रित बैठक घेत यावर
उपाय काढला. पळून गेलेल्या मुलीच्या लहान बहिणीसोबत या नवऱ्या मुलाचा विवाह ठरवण्यात आला.
मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या काकांचा या लग्नास विरोध होता. काकांनी तातडीने पोलिसांना फोन करुन विवाहस्थळी बोलावले आणि लग्न थांबवले. त्यामुळे अखेर रिकाम्या हाती नवऱ्यामुलासह वरातील घरी परतावे लागले.