लग्नानंतर सासरी न जाता नववधू थेट पोहोचली परीक्षा हॉलमध्ये
हल्ली मुली शिक्षणाच्या बाबतीत जागरुक होताना दिसतायत. याचं ताज उदाहरण राजस्थान मधील सीकर जिल्ह्यातील लोसल बिजारणियों येथे पाहायला मिळालं. चक्क लग्न झाल्यानंतर नववधू सासरी न जाता थेट परिक्षा देण्यासाठी परीक्षा हॉलवर गेली.
सीकर (राजस्थान) : हल्ली मुली शिक्षणाच्या बाबतीत जागरुक होताना दिसतायत. याचं ताज उदाहरण राजस्थान मधील सीकर जिल्ह्यातील लोसल बिजारणियों येथे पाहायला मिळालं. चक्क लग्न झाल्यानंतर नववधू सासरी न जाता थेट परिक्षा देण्यासाठी परीक्षा हॉलवर गेली.
जेव्हा सुनिता चौधरी वधूच्या वेशात परीक्षा हॉलवर पोहचली तेव्हा इतर विद्यार्थी तिच्याकडे पाहतच राहिले. शिक्षक आणि इतर लोकांनी तिचे आणि तिच्या सासरकडच्या मंडळींचे भरपूर कौतुक केले.
सुनिताचं लग्न २८ एप्रिलच्या रात्री झाले. दुसऱ्या दिवशी तिची ग्रॅजुएशनच्या शेवटची वर्षाची परीक्षा होती. लग्नाआधी तिने सासरकडच्या मंडळींना ही कल्पना दिली होती आणि तिला त्यांनी परवानगी देखील दिली. मग काय लग्नझाल्यावर मुलगी सासरी न जाता थेट परिक्षाहॉलवर पोहचली. नवरामुलगा मात्र ३ तास परीक्षा सेंटर बाहेर वाट बघत होता. परीक्षा देण्यास आलेल्या नववधूला बघायला लोकांनी गर्दी केली होती. सुनिताच्या शिक्षकांनी शिक्षणाबद्दलच्या तिच्या या उत्साहाचं कौतुक केल.