नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. दोन्ही देशातले मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी या दोघांमध्ये चर्चा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे याचं काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं. युरोपियन युनियन मधून ब्रिटन बाहेर पडण्याचा निर्णय झाल्यावर ब्रिटनच्या पंतप्रधान आणि मोदी यांची प्रथमच भेट होणार आहेत.


ब्रिक्झिटच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातला व्यापारी आणि लष्करी संबंधांवर विशेष भर दिला जाईल असं मे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान ब्रिटीश सरकारनं युरोपियन युनियनच्या बाहेरच्या देशातून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्यांना व्हीसा मिळणं कठीण जाणार आहे. 


हा मुद्दाही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला येण्याची शक्यता आहे. दरम्यान मे यांनी द संडे टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडिया, स्मार्ट सिटी आणि मेक इन इंडिया या तिन्ही योजनांचं कौतुक केलंय.