मुंबई : बीएस 3 गाड्यांच्या विक्रीवर 1 एप्रिलपासून लागू झालेल्या बंदीनंतर आता या गाड्या भंगारात जमा झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाड्या आता ना विकल्या जाऊ शकतात... ना त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकणार... त्यामुळे, न विकल्या गेलेल्या गाड्या आता कंपनीवर ओझं बनल्यात. तीन दिवसांपूर्वी या गाड्यांना कोर्टानं आणखीन मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर अनेक कंपन्यांनी या गाड्यांच्या किंमती कमी करत त्या विकण्याचा प्रयत्न केला... तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला... पण, आजपासून मात्र कंपन्यांना या गाड्यांची विक्री करता येणार नाही. त्यामुळे आता कंपन्यांकडे केवळ दोन पर्याय उरलेत.


पहिला पर्याय म्हणजे, या गाड्यांमध्ये बदल करत त्यांना बीएस 4 मानकापर्यंत नेण्यात येऊ शकतं... ज्यामुळे त्या कायदेशीरपणे विकता येऊ शकतील. 


आणि दुसरा पर्याय म्हणजे, या गाड्या परदेशात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात... आता हे कंपन्यांवर अवलंबून आहे की त्यांना कोणता पर्याय निवडायचाय.