काश्मीरला विकासाकडे घेऊन जाणारा `वानी`
बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.
जम्मू : बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.
नबील अहमद वानी असं त्याचं नाव आहे. 26 वर्षाचा नबील वानी सीमा सुरक्षा दलामध्ये असिस्टंट कमांडन्ट म्हणून रुजू होतोय. बी टेक असलेला नबील बीएसएफनं घेतलेल्या परीक्षेत तो अव्वल राहिला होता.
बेरोजगार ही जम्मू काश्मीरमधल्या तरुणांपुढची सगळ्यात मोठी समस्या आहे आणि शिक्षणच ती दूर करु शकतं... दगड फेकून भलं होणार नाही, हाती पेन धरल्यावरच काश्मीरी तरुणांचं भलं होईल, असं नबीलनं म्हटलंय.
नबीलनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नबीलचा प्रवास हा जम्मू काश्मीरमधल्या अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंहांनी दिलीय.