नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स देण्यात सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएलनेही जिओला टक्कर देण्याची तयारी केली आहे. बीएसएनएल जानेवारी २०१७ पासून 0 टेरिफ प्लान सुरू करणार आहे. तसेच रिलायन्स जिओने सुरूवातील प्रवेश फी १४९ रूपये घेतली होती, ती देखील बीएसएनएल घेणार नाहीय.


जिओने ही ऑफर फक्त फोर जी वापरणाऱ्या ग्राहकांना दिली आहे, मात्र बीएसएनएलने ही ऑफर सर्व 2 जी, 3 जी आणि 4 जी नेटवर्कच्या ग्राहकांनाही दिली आहे.


बीएसएनएल उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा, ओडिशा आणि पंजाबमध्ये लोकप्रिय आहे. बीएसएनएल कंपनी आपल्या मोबाईल ग्राहकांना बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड सेवेशी जोडण्याच्याही विचारात आहे.