नवी दिल्ली :  रिलायन्स जिओच्या फ्री व्हॉइस कॉल आणि सर्वात स्वस्त डाटा या ऑफर विरोधात बीएसएनएलने दंड थोपटले आहेत.  बीएसएसएल आता आपल्या २ जी आणि ३ जी ग्राहकांना जीओपेक्षा स्वस्त डाटा आणि लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल ही सेवा देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्सचे फ्री व्हॉइस कॉल आणि स्वस्त डाटा हा फक्त ४ जी ग्राहकांसाठी आहे. पण तो २ जी किंवा ३ जी ग्राहकांना मिळणार नाही. त्यामुळे हेच लक्षात घेऊन २ जी आणि ३ जी ग्राहकांना ही सुविधा बीएसएनएल उपलब्ध करून देणार आहे. 


बीएसएनएल चेअरमन अनूपम श्रीवास्तव यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की. आम्ही बाजाराचा जवळून अभ्यास करत आहोत. तसेच जीओच्या कामगिरीवरही आमचे लक्ष आहे. 


काय आहेत बीएसएनएलचे प्लॅन


१) बीएसएनएलच्या २ जी आणि ३ जी  ग्राहकांना  फ्री व्हॉइस 
कॉल 


२)  लाइफ टाइम फ्री व्हॉइल कॉल प्लॅन हा जानेवारीपासून सुरू होणार आहे.  ही ऑफर २ ते ४ रुपये हे जिओपेक्षा कमी असणार आहे. जिओची सुरवातीची किंमत ही १४९ रुपये आहे. 


३)  बीएसएनएलच्या ज्या ग्राहकांकडे घऱी ब्रॉडबँड कनेक्शन आहेत त्यांनाही ही ऑफर देण्यात येणार आहे. 


४) तसेच बीएसएनएलचे ग्राहक आपल्या ब्रॉडबँडचा वापर आउटगोईग मोबाईल कॉल करण्यासाठी करू शकतात.