कानपूर: कानपूरमध्ये अचानक घराचं छत कोसळून अनेक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. कानपूरच्या सिठमरा परिसरातही ही दुर्घटना आहे. या ठिकाणी एका लग्नाची वरात आली होती. ही वरात पाहण्यासाठी घराच्या छतावर 50 हून अधिक महिला जमल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या छतावर इतक्या महिला जमल्या की त्यांच्या वजनामुळं या घराचं छत पत्त्याप्रमाणे खाली कोसळलं. यामुळे महिलाही खाली कोसळल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी अनेक महिला मात्र जखमी झाल्यात.


पाहा इमारत कोसळतानाचा व्हिडिओ