नवी दिल्ली : कश्मीरमध्ये एनकाउंटरमध्ये मारला गेलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीच्या पित्याने मोठा खुलासा केला आहे. वडील मुजफ्फर वानीने म्हटलं की, आधी बुरहान हा भारतीय लष्करात भरती होण्याचं स्वप्न बघायचा. परवेज रसूल सारखा क्रिकेट खेळायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ जुलैला बुरहान वाणीचं एनकाउंटर झालं होतं त्यानंतर काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडली होती. रविवारी काश्मीरमधून कफ्यू हटवण्यात आला आहे. एका इंग्रेजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मुजफ्फर वाणीने म्हटलं की, ५ ऑक्टोबर २०१०ला त्याने घर सोडलं होतं. २ महिन्यापूर्वी त्याला समझवण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्याने घरी येण्यास नकार दिला. १९९४ मध्ये त्याचा जन्म झाला होता. 


मुजफ्फर जेव्हा १० वर्षाचा होता तेव्हा त्याने लष्करात येण्याची इच्छा वर्तवली होती. त्याला भारताकडून क्रिकेट खेळण्याची देखील इच्छा होती. असं देखील त्याच्या वडिलांनी सांगितलं
.