नवी दिल्ली : हिजबुल मुजाहिदीनचा 'पोस्टर बॉय' बुरहान वाणीचा शेवटचा ट्विट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या पोस्टमध्ये धर्म प्रचारक झाकीर नाईकचा उल्लेख करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये शुक्रवारी जवानांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान मारला गेला होता. बुरहानने त्याच्या ८ जुलैच्या शेवटच्या पोस्टमध्ये झाकीर नाईकचं समर्थन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झाकीर नाईकचं समर्थन करा अन्यथा अशी वेळ येईल की कुराण वाचवण्यावर बंदी येईल अशी पोस्ट बुरहानने शेअर केली होती. बुरहानने त्याच्या पोस्टमध्ये 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईँड हाफिज सईदला देखील या पोस्टमध्ये टॅग केलं होतं.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने गुरुवारी मुंबई पोलिसांना झाकीर नाईक आणि त्याच्या ट्रस्टची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलीस नाईकच्या भाषणांची चौकशी करत आहेत.


ढाकामधील रेस्तरांमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर झाकीर नाईक चर्चेत आला होता. आरोप आहे की, ढाका रेस्तरांवर हल्ले करणारे काही दहशतवादी नाईकच्या भाषणांपासून प्रेरित झाले होते.