नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोटार वाहन (सुधारणा) विधेयकाला हिरवा कंदील मिळालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, या विधेयकाला संमती मिळाल्यानंतर लायसन्सशिवाय गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना ५००० रुपयांचा तर दारु पिऊन गाडी चालवल्याचं आढळल्यास १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 


या विधेयकातील तरतुदी... 


- दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजारांचा दंड 


- 'हिट अॅन्ड रन' म्हणजेच धडक देऊन पळून गेल्यास २ लाख रूपयांचा दंड


- गाडीचा विमा नसेल तर २ हजार रूपये दंड


- ओव्हर स्पिडिंग १ हजार ते ४ हजार रूपये दंड


- वाहतूक नियम तोडल्यास ५०० रूपये दंड


- हेल्मेट घातले नसल्यास २ हजार रूपयांचा दंड


- रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास १० लाखापर्यंत भरपाई


- अल्पवयीन मुलाने गाडी चालवून नियम मोडल्यास त्यांच्या पालकांना जबाबदार धरण्यात येईल