यूपीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ८ तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
लखनऊ : उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. शेवटच्या टप्प्यासाठी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सलग तिसरा रोड शो वारणसीच्या रस्त्यांवर बघयाला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी गढवं आश्रमात जाऊन गोसेवा केली. त्यानंतर मोदींनी माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींच्या पुतळच्या पुष्पहार अर्पण केला. त्यासाठी मोदी स्वतः गल्ली बोलातून चालत गेले. शास्त्रीजींच्या घरी जाऊन मोदींनी त्यांच्या कुटुंबियांची चौकशीही केली.
येत्या आठ तारखेला पूर्व उत्तर प्रदेशातल्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान होईल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वारणसीचाही समावेश आहे. गेल्या तीन दिवसापासून मोदी वाराणसीत आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल ११ तारखेला लागणार आहेत.