बंगळुरू : बंगळुरू शहरात विविध ठिकाणी कॅनरा बँकची एटीएम बस लोकांच्या मदतीला धावून आली आहे. यामुळे काही प्रमाणात बंगळुर वासियांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी सुरूवातील ८०० लोकांनी या एटीएममधून एमजी रोडला ८ लाख रूपये काढले.


निळ्या रंगाच्या या बसवर कॅनरा एटीएम असं लिहिलंय, सुरूवातील शहरात पहिल्यांदा एमजी रोडला ही बस लोकांच्या नजरेस पडली आणि काही तासात ८०० लोकांनी ८ लाख रूपये काढले, फेसबुकवर कॅनरा बँकेची ही एटीएम बस ट्रेंडिगमध्ये आहे.