नवी दिल्ली : कर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं आता महागणार आहेत. एकूण ७४ औषधांच्या आयातीवरची अबकारी सवलत सरकारनं काढून टाकली असल्यानं या औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. विशेषत: कर्करोग आणि एड्सवरचे उपचार महागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या औषधांवर आता अबकारी शुल्क आकारण्यात येणार आहे, त्यात किडनी स्टोनवरचे उपचार, कॅन्सर केमोथेरेपी अँड रेडिओथेरेपी, हृदयाचे ठोके सुरळीत करणारे औषधं, मधुमेह, पार्किनसनचे आजार, हाडांचे आजार आणि साथीच्या रोगांवर उपचार करणारे अँटिबायोटिक्स यासारख्या औषधांचा समावेश असून, त्यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.


याशिवाय, बॅक्टेरिअल इन्फेक्शन, लुकेमिया, ऍनेस्थेटिक मेडिकेशन, एचआयव्ही, हेपॅटायटिस बी व्हायरस पेशी, ऑर्थ्रायटिस यासारख्या आजारांवर उपचार करणारी औषधेही आता महाग होणार आहेत.