नवी दिल्ली : वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील घराचे भाडे कमी करुन घेतले होते अशी माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ वर्षांपूर्वी २, ७६५ चौ. फूट घरासाठी प्रियंका गांधी ५३ हजार ४२१ रुपये भाडं भरण्यास असमर्थ होत्या. त्यावेळी त्यांनी भाडे कमी करुन आठ हजार ८८८ रुपये केले होते. सध्या त्या या घरासाठी ३१ हजार ३०० रुपये देत आहेत. त्या लोधी स्टेटमध्ये टाईप ४ बंगल्यात राहत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार सात मे २००७ मध्ये प्रियंका यांनी सरकारला याबाबत पत्र लिहिले होते. 


या पत्रात घराचे भाडे ५३ हजार ४२१ ही रक्कम खूप असल्याचे म्हटले होते. ही रक्कम माझ्या खर्च करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. एसपीजी यांच्या सांगण्यावरुन आपण हा बंगला घेतलाय. बंगलाच्या अधिकतर भागामध्ये एसपीजीचे लोक राहतात. माझ्या कुटुंबातील नाही, असे प्रियंका यांनी पत्रात म्हटले होते. नोएडाच्या देवाशीष भट्टाचार्य यांनी आरटीआय कायद्यांतर्गत ही माहिती मिळवली आहे. 


प्रियंकानी भाड्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर इतरांनीही हा मुद्दा उचलला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काही लोकांनी वाढलेले भाडे देण्याऐवजी जुने भाडे देणे सुरु ठेवले. यानंतर बंगल्यासाठी विशेष लायसन्स फी २४ जुलै २००३मध्ये पुन्हा एकदा ठरवण्यात आली. प्रियंका त्यावेळी आठ हजार ८८८ रुपये भाडे देत होत्या. यानुसार पंजाबचे माजी डीजीपी गिल यांच्या बंगल्याचे भाडे ६० हजार ७४१ रुपयांवरुन १० हजार ७१५ रुपये झालं होतं. तर बिट्टा यांचे भाडे ५५ हजार ५३६ रुपयांवरुन ८ हजार ५५५ रुपये ठरवण्यात आले होते.