नवी दिल्ली : कार कंपनी फोर्डने विक्री वाढवण्याच्या हेतूने आपल्या काही मॉडेलच्या किंमतीत कपात केल्याची घोषणा केलीये. फोर्ड अॅस्पायर आणि फोर्ड फिगोच्या किंमतीत तब्बल ९१ हजार रुपयांपर्यंतची घट करण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या किंमतीनुसार, फोर्ड अॅस्पायरची(पेट्रोल) किंमत ५.२८ लाखापासून ६.८ लाखापर्यंत असेल. 


तसेच डिझेलवर चालणाऱ्या फोर्ड अॅस्पायर गाडीच्या किंमतीतही कपात करण्यात आली असून त्याचे दर ६,९३७ लाखापासून ते ७.८९ लाख रुपयांपर्यंत असतील. 


तसेच फिगोच्या (डिझेल) किंमतीतही ५० हजार रुपयांपर्यंतची कपात करण्यात आलीये. याची किंमत ५.६३ लाखापासून ते ७.१८ लाख असेल.