सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटांचा तुटवडा असल्याने काही जणांच्या लग्नसमारंभालाही याचा फटका बसला. मात्र गुजरातच्या सुरतमध्ये एका मुस्लिम लग्नात मात्र नोटाबंदीचा कोणताच परिणाम जाणवला नाही. नोटांचा तुटवडा असतानाही लोकांनी वधू-वरांस आहेर दिला. 


सुरतमध्ये 17 डिसेंबरमध्ये एक लग्न पार पडले. जेव्हा लग्नासाठी उपस्थित लोक वधू-वरास आहेर देऊ लागले तेव्हा सारेच आश्चर्यचकीत झाले. अनेकांनी तर आहेर म्हणून चेक आणले होते. इतकंच नव्हे तर काहींनी क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करत आहेराची रक्कम दिली.