नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य सचिवांना सीबीआयने अटक केली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह ५ जणांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेंद्र कुमारवर ५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पाचही जणांना पटियाला हाऊस कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे. सीबीआयचे प्रवक्ते यांच्यामते पदाचा दुरुपयोग आणि लाच मागितल्याच्या आरोपाखाली यांना अटक करण्यात आली आहे. राजेद्र कुमारवर एका खासगी कंपनीला २००७ मध्ये फायदा करुन दिल्याचा आरोप आहे. राजेंद्र कुमारच्या अटकेवर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी म्हटलं की, 'आमच्या यशामुळे पीएम मोदी घाबरले आहेत.'


मागच्या वर्षी १५ डिसेंबरला सीबीआयने राजेंद्र कुमारच्या घरावर छापे मारले होते आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.