नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने पुंछमधील माल्ती सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे.


पाकिस्तानकडून गेल्या २४ तासात दोन वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. एलओसीतून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांनी ही जोरदार उत्तर दिलं आहे. जम्मू कश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून आधीही शंसत्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.