नवी दिल्ली : जुनी गाडी विकून एक्सचेंज ऑफरमध्ये मोठ्याप्रमाणावर सूट द्यायचा विचार केंद्र सरकार करत आहे. नवीन गाडी खरेदी करताना 8 ते 12 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे, तसंच करावरही 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची जुनी गाडी 31 मार्च 2005 च्या आधीची असणं बंधनकारक आहे. जुनी गाडी सरकारी कलेक्शन सेंटरमध्ये जमा केल्यानंतर ग्राहकाला प्रमाणपत्र देण्यात येईल. नवीन गाडी घेताना हे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र डिलरा दाखवावं लागेल, त्यानंतरच ही सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी गाडी सरकारी कलेक्शन सेंटरवर घेऊन जाणं आवश्यक असणार आहे.  


केंद्र सरकारनं या योजनेसाठी कन्सेप्ट नोट तयार केली आहे आणि नागरिकांचं मत देण्याचं आवाहन केलं आहे.