नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचा-यांची पगाराची बँक खाती आज फुल्ल होणार आहेत. कारण सातव्या वेतन आयोगानुसार लागू झालेली वेतन वाढ आजपासून त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.


वेतन आयोग चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून लागू होणार आहे.  दरम्यान केंद्राला लागू होणाऱ्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनाही त्वरीत लागू व्हाव्यात अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी 2 सप्टेंबरला राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.