नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिलेय. डीएमध्ये ६ टक्क्यांनी वाढ केलेय. त्यामुळे आता डीए १२५ टक्के झालाय. शुक्रवारी अर्थमंत्रालयाने याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढीव डीएचा लाभ हा १ जानेवारी २०१६पासून मिळणार आहे, तसे अर्थ व वित्त मंत्रालयाने स्पष्ट केलेय. केंद्र सरकारने महागाई  भत्ताबाबत गेल्याच महिन्यात घोषणा केली होती. त्यानुसार हा महागाई भत्ता १ जानेवारी २०१६पासून देण्यात येणार आहे. आधी ११९ टक्के होता तो आता १२६ टक्के झालाय.


१ जानेवारी २०१६पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांना महागाई वाढवून देण्याबाबत २३ मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय करण्यात आला होता. या नव्या निर्णयामुळे डीएचा लाभ ५० लाख कर्मचाऱ्यांना तर ५८ लाख निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.


हा भत्ता २०१६-२०१७ ( जानेवारी २०१६ पासून १४ महिने म्हणजेच फेब्रुवारी २०१७) पर्यंत हा लाभ मिळेल. त्यामुळे अनुक्रमे वर्षाला ६,७९६.५० कोटी रुपये आणि ७,९२९.२४ कोटी रुपये शासनावर बोजा पडणार आहे.