देशात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार : मोदी
कोइंबतूर, तामिळनाडू : देशात वैद्यकीय क्षेत्राचा होत असलेला विकास आणि या क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता आता केंद्र सरकार देशभरात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोइंबतूर येथे सांगितले.

डेक्कन क्रॉनिकल वृत्तपत्रातील एका बातमीनुसार देशभरातील काही वैद्यकीय महाविद्यालयांत या जागा निर्माण केल्या जाणार आहेत. त्याचसोबक कोइंबतूर, कन्याकुमारी, तिरुनेलवेली आणि मदूराई येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा विकासही केला जाणार आहे. एकट्या तामिळनाडू राज्यात ३५५ जागा वाढवल्या जाणार आहेत.
पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांची कोइंबतूर येथे पहिलीच भेट होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एम्प्लॉइज स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (इएसआयसी)च्या नव्या वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या इमारतीचे उद्घाटन केले.
आम्ही देशभरातील वैद्दकीय सुविधा सुधारण्याच्या प्रयत्नात आहोत. आता आम्ही देशभरात एमबीबीएसच्या १०,००० नव्या जागा वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत. आत्तापर्यंत केंद्र शासनातर्फे २३ महाविद्यालयांना ७०० जागा वाढवण्याच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत, असे मोदी म्हणाले.