केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडींच्या गाडीला अपघात
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने राजीव प्रताप रूडी या अपघातात थोडक्यात बचावले आहेत, त्यांना किरकोळ जखम झाली असल्याचंही सांगण्यात येत आहे.
छपरा : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने राजीव प्रताप रूडी या अपघातात थोडक्यात बचावले आहेत, त्यांना किरकोळ जखम झाली असल्याचंही सांगण्यात येत आहे.
ही घटना भाजपचे राजीव प्रताप रूडी यांच्याच बिहारमधील छपरा मतदारसंघात झाली आहे. राजीव प्रताप रूडी हे छपराहून पाटण्याला जात असताना त्यांच्या कारला हा अपघात झाला.
अपघातानंतर ते आता पाटण्याला रवाना झाले आहेत, कारचं जास्त नुकसान न झाल्याने त्याच कारने ते पाटण्याला निघाले आहेत.