महिलांच्या शॉर्ट स्कर्ट घालण्यावर डिस्कोमध्ये बंदी
डिस्कोमध्ये महिलांच्या स्कर्ट घालण्यावर चंदीगड प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रशासनाने हा निर्णय `कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अब्यूजमेंट` या पॉलिसीच्या आधारे घेतला आहे. या बंदीमुळे आता शॉर्ट स्कर्ट घालून तरुणींना डिस्कोमध्ये जाता येणार नाही आहे. जर कोणत्याही नाइटक्लबने याची परवानगी दिली तर त्याचं लाईसन्स हे रद्द केलं जाणार आहे.
चंदीगड : डिस्कोमध्ये महिलांच्या स्कर्ट घालण्यावर चंदीगड प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रशासनाने हा निर्णय 'कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अब्यूजमेंट' या पॉलिसीच्या आधारे घेतला आहे. या बंदीमुळे आता शॉर्ट स्कर्ट घालून तरुणींना डिस्कोमध्ये जाता येणार नाही आहे. जर कोणत्याही नाइटक्लबने याची परवानगी दिली तर त्याचं लाईसन्स हे रद्द केलं जाणार आहे.
प्रशासनाच्या या निर्णयाचा महिला आणि बार मालकांनीही निंदा केली आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की महिलांनी काय घालावं याचा निर्णय शासन कसा घेऊ शकतो. तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, शॉर्ट स्कर्टमुळ अँटीनॅशनल एलीमेंट्सला बढावा मिळतो. नाईटक्लब आणि डिस्कोच्या काही नियमांमध्ये ही काही बदल करण्यात आले आहे. आता नाईटक्लब हे फक्त २ ऐवजी १२ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे. नियम मोडणाऱ्या क्लबवर कारवाईचे देखील आदेश देण्यात आले आहे.