चंदीगड ते दिल्ली विमान प्रवासाचा खर्च ९९ हजार रुपये
जाट समाज आरक्षणाच्यामुद्द्यावरुन सुरु असलेले आंदोलनाचा फटका विमान सेवेवर झाल्याचे दिसून येतेय. जेट एअरवेजने चंदीगड ते पंजाब विमान प्रवासाच्या तिकीटाची किंमत तब्बल ९९ हजार रुपये इतकी ठेवलीये.
नवी दिल्ली : जाट समाज आरक्षणाच्यामुद्द्यावरुन सुरु असलेले आंदोलनाचा फटका विमान सेवेवर झाल्याचे दिसून येतेय. जेट एअरवेजने चंदीगड ते दिल्ली विमान प्रवासाच्या तिकीटाची किंमत तब्बल ९९ हजार रुपये इतकी ठेवलीये.
MakeMyTrip.com या वेबसाईटवर जेट एअरवेजची या मार्गावरील केवळ दोन सीट्स शिल्लक आहेत. या प्रवासाचे तिकीट तब्बल ९९ हजार १२८ रुपये आहे. तर स्पाईस जेटच्या विमानात एक सीट रिकामी असून याचे तिकीट १५ हजार ४४ रुपये इतके आहे.
हरयाणातील आंदोलनामुळे उत्तर रेल्वेच्या ५२७ गाड्या रद्द करण्यात आल्यात. यात २१० एक्सप्रेस तर ३१७ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. यासोबतच चंदीगड ते मुंबई विमान प्रवासाचे तिकीट १४ हजार ४१ आणि ५२ हजार ६३२ रुपये इतके आहे.