ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट चालकांचं संपाचं हत्यार
ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.
मुंबई : ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. एकीकडे उच्च न्यायालय ऑनलाइन औषध विक्री बाबत गंभीरपणे विचार करत असताना सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करतंय, असा आरोप केमिस्ट संगठनांकडून केला जात आहे.
देशभरातील साडे आठ लाख केमिस्ट यात सहभागी होणार आहेत. 23 तारखेपर्यंत याबद्दल गांभीर्याने विचार झाला नाही तर बेमुदत संप करणार असल्याचा इशारा केमिस्ट संघटनेनं दिला आहे.