चेन्नई : चेन्नईच मेट्रोच्या काम सुरू असलेल्या रस्त्याला अचानक भगदाड पडल्याने बस आणि कार त्यामध्ये कोसळली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अण्णा सलाई रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने कार आणि बस त्यामध्ये कोसळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेदापलानी येथे चाललेली ही बस बसस्टॉपवर थांबल्यानंतर खाली जात असल्याचं चालकाला लक्षात आलं. त्यामुळे चालकांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून उतरण्यास सांगितलं.


सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. अग्निशामक दलाच्या मदतीने या दोन्ही गाड्या खड्ड्याबाहेर काढण्यात आल्या. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असून डागडुजीचं काम सुरू आहे.