सुकमा : सीआरपीएफच्या एका हेलिकॉफ्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच, २४ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षली हल्ल्यात २५ जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. सध्या सोशल मीडियावर दिसणारा हा अपघात या हल्ल्यानंतर म्हणजेच २६ एप्रिल रोजी झाला होता.


केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) हे हेलिकॉफ्टर तांत्रिक बिघाडामुळे हेलीपॅडमध्ये लँन्डींग करताना दुर्घटनाग्रस्त झालंय. तेल गळतीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.


सुदैवानं या अपघातात पायलटसहीत सर्व लोक थोडक्यात बचावले... एका स्थानिकाच्या मोबाईलमध्ये या अपघाताची चित्रं कैद झाली.