बंगळूरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हे अंधश्रद्धेचे कडवे विरोधक आहेत मात्र त्यांनी असे पाऊल उचललेय की ज्यामुळे प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या कारच्या बोनेटवर कावळा बसला म्हणून त्यांनी चक्क गाडीच बदललीये. त्यांनी तब्बल ३५ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्यूनर विकत घेतलीये. 


बंगळरु मिररच्या वृत्तानुसार, ही घटना २ जूनची आहे. त्यांच्या कृष्णा बंगल्यासमोर सरकारी गाडी पार्क करण्यात आली होती. त्याचवेळी एक कावळा बोनेटवर बसून काव काव करु लागला.


या कावळ्याला हाकलण्याचा खूप प्रयत्न झाला. मात्र तो तेथून हलण्यास तयार नव्हता. त्यानंतर या कावळ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. 


जवळच्या अधिकाऱ्यांनी दिला गाडी बदलण्याचा सल्ला


मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी कावळ्याचे बोनेटवर बसणे अपशकुन असल्याचे सांगून त्यांना चक्क गाडी बदलण्याचा सल्ला दिला. वाहतूक मंत्रालयानेही त्याच मॉडेलची आणि त्याच रंगाची नवी गाडी खरेदी केली.  


नव्या कारबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा तर्क


नव्या कारबाबत विचारले असता जुन्या गाडीवर ओरखडे आल्याने तिला सर्व्हिसिंगसाठी पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलेय. ही ३५ लाखांची कार राज्याच्या वाहतूक विभागाच्या नावाने रजिस्टर्ड आहे.