मोदींनी चीनचा हा सल्ला ऐकला तर देशात खळबळ माजेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाचं अनेकांनी कौतूक केलं आहे. चीनने देखील पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाचं अनेकांनी कौतूक केलं आहे. चीनने देखील पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या निर्णयावरच न थांबता आणखी काही कठोर निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी जर हा निर्णय घेतला तर देशात आणखी एक खळबळ माजणार आहे.
चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार देशात भ्रष्टाचार संपवण्यासाठी करंसी नोटच रद्द करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सिस्टम सुधरण्यासाठी रोख रक्कमने व्यवहारच होऊ नये असा सल्ला यामध्ये देण्यात आला आहे. प्लास्टीक मनीचा वापर झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि बनावट नोटांचा ही प्रश्न उद्धभवणार नाही.
शी जिनपिंग यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारा विरोधात कठोर कारवाई आणि पाऊलं उचलत एक लाखाहून अधिक जणांना शिक्षा दिली होती.