काश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे
जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बारामुला : जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिजबुल कमांडरचा दहशतवादी बुरहान वानीला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये सुरु झालेला हिंसाचार कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
बारामुलामध्ये मशिदीत नमाज पडल्यानंतर काही जणांनी घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी करणाऱ्यांच्या हातात पाकिस्तान आणि चीनचे झेंडे असल्याची माहिती खासगी वृत्तवाहीनीनं दिली आहे. चीननं काश्मीरला मदत करावी असं आवाहन या आंदोलनकर्त्यांनी केल्याचंही वृत्त आहे.
पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केल्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.