मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी पहिल्यांदा गोरखपूरमध्ये जाणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. २६ मार्चला गोरखपूरमध्ये योगीराज बाबा गंभीरनाथ यांच्या पुण्यतिथीच्या समारोहात ते सहभागी होणार आहेत. गोरखनाथ मंदिरात सकाळी ११ वाजता हा समारोह सुरु होणार आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. २६ मार्चला गोरखपूरमध्ये योगीराज बाबा गंभीरनाथ यांच्या पुण्यतिथीच्या समारोहात ते सहभागी होणार आहेत. गोरखनाथ मंदिरात सकाळी ११ वाजता हा समारोह सुरु होणार आहे.
मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ पहिल्यांदा गोरखपूरला चालले आहेत. मुख्यमंत्री २६ मार्चला समारोहानंतर भाजप कार्यालयात सर्व खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, जिल्हाअध्यक्ष यांची भेट घेणार आहेत.
एम्स गोरखपूरमध्ये चिकित्सा शिक्षा विभागासोबत ते बैठक करणार आहेत. सोबतच ते पावर कॉरपोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेणार आहेत. योगी आदित्यनाथ यानंतर रविवारी रात्री पुन्हा लखनऊला परत येतील. आज मुख्यमंत्री गोरखपूर एयरपोर्ट वरुन नंदानगर, मोहद्दीपुर, यूनिवर्सिटी चौक, गणेश चौक, गोलघर आणि काली मंदिर वरुन महाराणा प्रताप इंटर कॉलेजच्या मैदानात पोहोचणार आहेत. रस्त्यात त्यांचं स्वागत होणार आहे. त्यानंतर त्यांचं नागरिक अभिनंदन होणार आहे. मुख्यमंत्री आज रात्री विश्राम गोरखनाथ मंदिरमध्येच राहतील.