ट्रिपल तलाकवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत योगी सरकार
ट्रिपल तलाकचा मुद्दा सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. यूपी सरकार देखील मुस्लिम महिलांच्या या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करत असल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
लखनऊ : ट्रिपल तलाकचा मुद्दा सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. यूपी सरकार देखील मुस्लिम महिलांच्या या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करत असल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
योगी सरकार ट्रिपल तलाकमुळे बेघर झालेल्या महिलांसाठी आश्रय गृह बनवण्याची तयारी करत आहे. हे आश्रय गृह वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनवण्यात येणार आहे.
कॅबिनेटमध्ये ठेवला जाईल प्रस्ताव
योगी सरकारमधील महिला कल्याण विभाग वक्फ बोर्डाच्या जमिनीवर तलाक झालेल्या महिलांसाठी आश्रय गृह बनवणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे. कॅबिनेट मंत्री रीता बहुगुणा जोशी या कामासाठी इच्छूक आहेत.
राणी झांसी योजनेच्या अंतर्गत मदत
यूपी सरकार महिलांना मदत करण्यासाठी 'राणी झांसी योजना' चालवते. या योजनेतून अक्षम महिलांना मदत केली जाते. सरकार या योजनेच्या अंतर्गत मुस्लीम महिलांना मदत करण्याची तयारी करत आहे. यामधून महिलांना आर्थिक मदत केली जाईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला पोहोचल्या आहेत. ज्या ट्रिपल तलाकच्या शिकार झाल्या आहेत. भाजपने निवडणुकीत यालाचा मोठा मुद्दा बनवला होता. भाजप २०१९ च्या निवडणुकांना समोर ठेऊन हा मुद्दा हातळतांना दिसत आहे.