लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर लोकांसमोर पक्षाचा आणि सरकारचा अजेंडा ठेवला आहे. कमीत कमी दिवसांमध्ये योगी सरकारने जे मोठे निर्णय घेतले आहेत त्यावरुन पुढे काय होणार याचे संकेत मिळू लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऑपरेशन रोमियो' असेल किंवा मग अवैध कत्तलखान्यांवरील कारवाई असो. १९ मार्चला शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही असे निर्णय घेतले जे अतिशय संवेदनशील मानले जात आहे.


अवैध कत्तलखान्यांवर बंदी


निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने कत्तलखान्यांचा मुद्दा उचलला होता. आता योगी सरकार त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करतांना दिसत आहेत. ग़ाजियाबाद, इलाहाबाद आणि राज्यातील इतर भागामधील कत्तलखाने बंद केले जात आहेत.


ऑपरेशन रोमियो


यूपीमध्ये महिलांची छेडछाडीचे प्रकरण कमी करण्यासाठी अँटी रोमियो दल बनवलं गेलं आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर यूपी पोलिसांनी राज्यात अनेक ठिकाणी कारवाईला सुरुवात केली आहे. हा भाजपच्या जाहीरनाम्यातील मुद्दा होता. सरकारमध्ये येताच भाजप सरकारने हा निर्णय घेतला. ११ जिल्ह्यांमध्ये रोमियो ऑपरेशन सुरु झालं.


रामायण म्यूजियम


रामराज्य आणण्याची गोष्ट करणाऱ्या भाजप सरकारने सत्तेत येताच राम जन्मभूमीच्या वाद असलेल्या अयोध्या शहरात एक मोठा निर्णय घेतला आहे. 
योगी सरकारने मंगळवारी पर्यटन मंत्री महेश शर्मा यांना भेटल्यानंतर अयोध्या येथे रामायण संग्रहालयासाठी २५ एकर जागेची घोषणा केली. यासाठी मोदी सरकारने आधीच १५४ कोटींची घोषणा केली आहे.


गाई तस्करीवर बंदी


योगी सरकारने राज्यातील गाईंच्या तस्करीवर बंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा एक गोसेवक म्हणून आहे.


लाल दिवा नाकारला


राज्यातील व्हाआयपी संस्कृतीवर लगाम बसवण्यासाठी योगी सरकारने निर्णय घेतला आहे की, कोणताही मंत्री त्याच्या गाडीवर लाल दिवा नाही लावणार. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारने देखील असाच निर्णय घेतला आहे.